Dehugaon News : अभंग प्रतिष्ठानचे सदस्य वैभव काळोखे यांच्यातर्फे पाच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

Dehugaon News : अभंग प्रतिष्ठानचे सदस्य वैभव काळोखे यांच्यातर्फे पाच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

Pckhabar- अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवासात सहकार्य करीत आहे. विद्यार्थी शिक्षण प्रेरणा उपक्रम हा विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे. अभंग प्रतिष्ठानचे सदस्य वैभव बाळासाहेब काळोखे यांच्या वतीने पाच विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके, गाईड इ. शैक्षणिक साहित्य देऊन या वर्षीच्या उपक्रमाचा प्रारंभ झाला.

प्रतिकूल स्थितीतून संघर्ष करत असणारे हे विद्यार्थी अशा सहकार्यातून निश्चितपणे शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणा घेतील.

आपणही या उपक्रमाच्या माध्यमातून अशा प्रतिकूल स्थितीतून शिक्षण घेणाऱ्या होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य करू शकता. किमान एका विद्यार्थ्याला आपल्याकडून असे सहकार्य होईल यासाठी प्रयत्न करूया.

याप्रसंगी वैभव काळोखे, पत्रकार राजेंद्र काळोखे, सुजित मोरे,उपाध्यक्ष अभंग प्रतिष्ठान,सागर मोरे,सचिन कुंभार,दिनेश साळुंके, विजय मोरे,अजिंक्य सकोरे,सचिन काळोखे, प्रशांत सुतार, विकास कंद,विजय ठानगे,उमेश कुंभार हे अभंग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *