Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर, अनेक मातब्बर नगरसेवक ‘सेफ झोनमध्ये’

Talegaon Dabhade News :
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर, अनेक मातब्बर नगरसेवक ‘सेफ झोनमध्ये’

Pckhabar- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. या सोडतीमध्ये अनेक मातब्बर नगरसेवक सेफ झोनमध्ये आहेत. त्यामुळे या नगरसेवकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र, ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे तीन प्रभाग सोडून इतर प्रभागासाठी पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नगरपरिषदेच्या सरदार अजितसिंहराजे दाभाडे सरकार व्यापारी संकुलातील सभागृहात सोमवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीव्दारे आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी  अजय पवार, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांच्यासह आजी- माजी नगरसेवक, इच्छूक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

द्विसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठी तळेगाव दाभाडे शहरात एकूण १४ प्रभागातून २८ उमेदवार निवडून देण्यात येणार  आहेत.  प्रभाग क्रमांक १, २, ५, ६, ७, ८, ९, ११, १२, १३, १४ या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण या जागांसाठी राखीव झाले आहेत.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये लोकसंख्या ४,१९२ असून त्यापैकी अनुसूचित जातीचे ४९४ जण (११.७८ टक्के) तर अनुसूचित जमातीचे १८२ मतदार आहेत. तर प्रभाग क्र. १० खळदे आळी- संभाजीनगर परिसरातील लोकसंख्या ४,०८२ असून येथे अनुसूचित जातीचे ४९० (१२ टक्के) तर अनुसूचित जमातीचे ६४ लोकसंख्या असल्याने या दोन्ही प्रभागांसाठी ही आरक्षण सोडत घेण्यात आली.  प्रभाग क्रमांक ४ हा अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारणसाठी राखीव झाला आहे. यावेळी  पुरुषाऐवजी अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारासाठी आरक्षित झाला आहे. या प्रभागात   आनंदनगर, मनोहरनगरचा समावेश होतो. येथील एकूण लोकसंख्या ४,२६६ असून अनुसूचित जातीचे ३७३ व अनुसूचित जमातीचे २९५ नागरिक आहेत. या प्रभागात महिलेचे आरक्षण पडल्याने विद्यमान नगरसेवक रोहित लांघे  यांची अडचण झाली आहे.

असे असणार प्रभागाचे आरक्षण

■ प्रभाग क्र. १ अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण

■ प्रभाग क्र. २ अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण

■ प्रभाग क्र. ३ अ अनुसूचित जाती महिला, ब. सर्वसाधारण

■ प्रभाग क्र.४ अ अनुसूचित जमाती महिला, ब. सर्वसाधारण

■ प्रभाग क्र.५ अ सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण

■ प्रभाग क्र.६ अ सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण

■ प्रभाग क्र.७ अ सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण

● प्रभाग क्र. ८ अ सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण

■ प्रभाग क्र. ९ अ सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण

• प्रभाग क्र.१० अ अनुसूचित जाती, ब. सर्वसाधारण

● प्रभाग क्र. ११ अ सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण

■ प्रभाग क्र. १२ अ सर्वसाधारण

महिला, ब. सर्वसाधारण

● प्रभाग क्र. १३ अ सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण

● प्रभाग क्र. १४ अ सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *