Pune News : भविष्यात असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्राचे स्वतंत्र ॲप विकसित करणार – डॉ. राजेंद्र लाहोरे
आगामी काळात दुबईला वैद्यकीय परिषद घेण्याचा मानस
Pckhabar- असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र संघटनेची स्थापना 2016 मध्ये झाली. आतापर्यंत चार वेळा वैद्यकीय परिषदा झाल्या आहेत. प्रत्येक परिषदेला रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यामुळे यावर उपाय म्हणून भविष्यात संघटनेचे स्वंतत्र ॲप विकसित केले जाईल. या ॲप वर संघटनेची सर्व माहिती अपडेट केली जाईल. तसेच आगामी काळात दुबईला वैद्यकीय परिषद घेण्याचा मानस असल्याचा असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र लाहोरे यांनी सांगितले.

असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्यतर्फे ‘सिनर्जी 2022′ अंतर्गत शनिवार (दि30) एप्रिल आणि रविवार (दि.1) मे अशा दोन दिवस पुण्यातील राजा बहादूर मिल रोड, संगमवाडी येथील हॉटेल शेरेटन ग्रँडमध्ये आयोजन करण्यात आले होते. ही परिषद यशस्वी केल्याबद्दल
संघटनेतील पदाधिकारी आणि इतरांचे आभार मानताना डॉ. लाहोरे बोलत होते. महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे डॉ. दिलीप वांगे, सिनर्जी 2022’ या वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेश पवार, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. अभिजीत आग्रे, डॉ. दिलीप पुराणिक, डॉ. समीर रासकर, डॉ. मंजिरी केसकर, माजी अध्यक्षा डॉ. संगिता साळवी, डॉ. राधेश्याम झेंडे, डॉ. संदीप निमसे, मयुरेश कुलकर्णी यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र लाहोरे म्हणाले
परिषद मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार होण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले. स्पाॅन्सर शोधून तसेच इतर बाबीतून आर्थिक नियोजन केले. 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या परिषदेत प्रत्येक वर्षी सहभागी होणाऱ्या शलाकींची संख्या वाढत आहे. तसेच आगामी काळात संघटनेसाठी स्वतंत्र ॲप विकसित करण्याचे नियोजन आहे. या संघटनेची सर्व माहिती अपडेट करण्यात येईल. तसेच आत्तापर्यंत पुणे, कोल्हापूर आणि श्रीलंकेतील कोलंबो शहरातही परिषद झाली आहे. आगामी काळात दुबईला परिषद घेण्याचा मानस असल्याचे डॉ. लाहोरे म्हणाले.
डॉ. संतोष मुंडे म्हणाले, आयुर्वेदिक मध्ये 8 फॅकल्टी आहेत. त्यापैकी शलाक्यतंत्रची ही सर्वात टाॅपची वैद्यकीय परिषद आहे. सिनर्जी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होणे आवश्यक आहे. पुढची परिषद ही दुबईलाच झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
या समारोप समारंभात उत्कृष्ट पेपर प्रजेंटेशन सादर करणाऱ्या आकाश गायकवाड, डॉ. श्रीकांत टिपन्नवार, डॉ. माधव मधुकर, तरूण संशोधक म्हणून डॉ. राजू एस. एन., बेस्ट सर्जरी व्हिडिओबद्दल डॉ. विवेक कानडे यांच्या गौरव करण्यात आला. त्याचबरोबर परिषदेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल डॉ. समीर रासकर, डॉ. मयुरेश कुलकर्णी, डॉ. राधेश्याम झेंडे, डॉ किरण खाडे, डॉ.मयूर लांडे , संदीप दारुंडे यांचीही यावेळी सन्मान करण्यात आला.
या परिषदेमध्ये घेण्यात आलेल्या ‘लकी ड्रा’ मध्ये विजेत्या ठरलेल्या अभिजित घाडगे, लाखे वनिया, विशाल रत्नपारखी यांनाही मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.










Leave a Reply