SYNERGY 2022 Pune News : प्रत्येक रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टर शंभर टक्के प्रयत्न करतात : न्यायवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मंदार रानडे

Pune News : प्रत्येक रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टर शंभर टक्के प्रयत्न करतात : न्यायवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मंदार रानडे

Pckhabar- गंभीर रुग्णावर उपचार सुरू असताना रुग्ण दगावल्यास डॉक्टरांना दोषी ठरविण्याची मानसिक दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पोलिसांनीही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्या आधी आपण कोणते कलम लावतो. याची शहानिशा करावी. जेणेकरून डॉक्टर खोट्या गुन्ह्यात अडकला जाणार नाही.
प्रत्येक रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टर शंभर टक्के प्रयत्न करतात. तसेच डॉक्टरांवर कोणते कलम लावले आहेत, याचीही माध्यमांनी खातरजमा करणे तितकेच गरजेचे आहे, अशी अपेक्षा पुण्यातील न्यायवैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंदार रानडे यांनी व्यक्त केली.

असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्यतर्फे  ‘सिनर्जी 2022’ अंतर्गत  शनिवार (दि30) एप्रिल आणि उद्या रविवार (दि.1) मे अशा
दोन दिवस वैद्यकीय परिषदेचे पुण्यातील राजा बहादूर मिल रोड, संगमवाडी येथील हॉटेल शेरेटन ग्रँडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये ‘डॉक्टर मारेकरी नसून जीवन देणारे’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. रानडे बोलत होते. याप्रसंगी नामांकित नेत्रतज्ज्ञ डॉ. अभिजीत आग्रे, डॉ. समीर रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मंदार रानडे पुढे बोलताना म्हणाले
कोणताही डॉक्टर रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतो. मात्र, काही वेळा 100 टक्के प्रयत्न करूनही रुग्ण दगावतो. डॉक्टरांना मारहाण केली जाते, रुग्णालयाची तोडफोड केली जाते.  अशावेळी
काही राजकीय मंडळींना हाताशी धरून डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल केले जातात. 302  सारखा गुन्हा दाखल करून डाॅक्टरांना जेलमध्ये पाठविल्याच्याही घटना यापूर्वी घडल्या आहेत.

पोलिसांनी डॉक्टर विरोधात कोणते कलम लावले आहे, याची माध्यमांनी बातमी करताना शहानिशा करावी. माध्यमांनी डॉक्टरांशी संपर्क होऊ शकला नाही, असे न छापता त्यांची बाजू वृतपत्रात मांडावी. तसेच डॉक्टरांना भारतीय दंड संहितेचे कलम माहिती नाहीत आणि ते प्रतिबंधात्मक आणि सक्रिय पावले उचलत नाहीत, त्यामुळे डॉक्टरांनीही कायदे समजून घेणे काळाची गरज झाली असल्याचे डॉ. रानडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *