Dehu News: संत गोरोबाकाका यांची ७०५ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी

Pckhabar- संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात श्री क्षेत्र देहू येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थान, समस्त कुंभार समाज देहुगाव, वारकरी साहित्य परिषद पुणे शहर आणि वारकरी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गोरोबाकाका यांची ७०५ वी पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात गुरूवारी साजरी करण्यात आली.

पहाटे समस्त कुंभार समाजाच्या वतीने संत गोरोबाकाका मंदिरात अभिषेक करण्यात आला. सकाळी गोरोबा काका मंदिरात भजन सेवा संपन्न झाली.

दुपारी संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर कीर्तन मंडपात गुरुनाथ भजनी मंडळ वडनेर ता.शिरूर यांची भजन सेवा झाली. प्रतिमा पूजन झाल्यानंतर साय.ह भ प आनंदराव महाराज कदम यांची संत गोरोबाकाका यांच्या अभंगावर कीर्तन सेवा संपन्न झाली.

त्यानंतर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मा.उपसरपंच सचिन कुंभार, वारकरी साहित्य परिषद उपाध्यक्ष ह-भ-प प्रशांत महाराज मोरे देहूकर, सचिव श्री रामदास कुटे,मा. विश्वस्त संभाजी महाराज मोरे देहूकर,मा अध्यक्ष राम नाना मोरे, हभप मधुकर मोरे, श्री जालिंदर महाराज काळोखे ,ह भ प पुरुषोत्तम महाराज मोरे,प्रा विकास कंद, ह भ प मोहन महाराज मगर,योगिताताई बटवाल, संतोष कुंभार (अध्यक्ष:कुंभार समाज पुणे जिल्हा) , भगवान कुंभार (अध्यक्ष:मुळशी तालुका कुंभार समाज),ऋषिकेश काशीद (अध्यक्ष:कुंभार समाज पिं.चिं),अक्षय राऊत (उद्योजक स्वप्नपूर्ती ग्रुप रत्ना अमृततुल्य),राजेंद्र वाघचौरे (कुंभार स.प्रसार माध्यम प्रमुख), अभिजित संजय हातनोलकर(अध्यक्ष:कुंभार स.युवक आघाडी पुणे जिल्हा) ,मंगेश नंदकिशोर कुंभार, सुधीर कुंभार,मयूर शिर्के ,जयंत कुंभार,अनिकेत कुंभार,मनोहर भालेराव, वैभव तुळसनकर,
विलास कुंभार ,शशिकांत कुंभार, रघुनाथ वाघोलीकर ,रामदास कुंभार ,ज्ञानेश्वर कुंभार ,जयराम कुंभार ,दिनेश कुंभार,सुनील कुंभार,सोमनाथ जगताप,गणेश साळुंके, मिलिंद कुंभार,ज्ञानदेव काळे ,सचिन कुंभार ,संभाजी कुंभार ,उमेश कुंभार,राहुल कुंभार, जयंत कुंभार, सचिन कुंभार, सुनील कडूसकर,विशाल परदेशी,जयेश मोरे,सोमनाथ चव्हाण,सागर मोरे, सचिन हगवणे,प्रशांत सुतार ,गणेश हगवणे, नारायण पचपिंड ,विजय मोरे, सचिन काळोखे ,बिभीषण खोसे,विनायक गोलांडे समस्त कुंभार समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Leave a Reply